आज भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि दोन बँका, HDFC आणि ICICI, याना मंगळवार रोजी धमकीचा एक मेल प्राप्त झालाय, ज्यामध्ये अशी धमकी दिलीय कि जर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जर आपल्या पदा वरून राजीनामा नाही दिला तर रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात आणि दोन बँकांच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात येतील तर असा दावा त्यांनी या ई-मेल द्वारे सांगितलेला आहे, कोण असतील हे ज्यांनी डायरेक्ट देशाचं गव्हर्नर ला धमकी दिलीय,
बातमी सर्वात पहिली मुंबई पोलिसांनी सर्वाना सांगितली कि, आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि दोन प्रमुख बँकांना बॉम्बहल्ल्याची धमकी आली आहे, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि RBI गव्हर्नर शक्तिकांत दास या दोघांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
बँकांना हा बॉम्बहल्ल्याचा धमकी बद्दल त्यांना पाठवलेल्या ईमेलद्वारे प्राप्त झाला. तर या ईमेल मध्ये- “ब्रेकिंग न्यूज” या विषयांसह अनेक छोट्या – मोठ्या अधिकाऱ्यांना सीसी करून. त्याने असे लिहले आहे कि रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट येथील नवीन मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीत, चर्चगेट येथील HDFC हाऊसमध्ये आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ICICI बँक टॉवर्स येथे 3 बॉम्ब्सची कथित ठिकाणे जोडली होती. याचा लगेच माहिती मिळता मुंबई पोलिसानी आपली चौकशी चालू केली,
RBI ला आलेला हा ईमेल खिलाफत.इंडिया@gmail.com या आयडीवरून दुपारी 1:30 वाजता RBI गव्हर्नरच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या ई-मेल मध्ये असे लिहले आहे कि, “आम्ही मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि खासगी क्षेत्रातील दोन बँकांसह 11 बॉम्ब ठेवले आहेत,” असे या ईमेलमध्ये म्हटले आहे.
ई-मेल मध्ये अजून एक पॉईंट मेंशन केलाय कि या घोटाळ्यामध्ये RBI गव्हर्नर ‘शक्तिकांत दास’, अर्थमंत्री ‘निर्मला सीतारामन’, काही शीर्ष बँक अधिकारी आणि भारत सरकारचे काही प्रसिद्ध मंत्री यांचा समावेश आहे, यासाठी आमच्याकडे पुरेसे ठोस पुरावे आहेत,” असे या ईमेलमध्ये पुढे म्हटले आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी 1.30 वाजता रिझर्व्ह बँकेच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीत, फोर्ट, चर्चगेट येथील HDFC हाऊसमध्ये आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ICICI बँक टॉवरमध्ये स्फोट होईल. हे सर्व 11 बॉम्ब एकामागोमाग स्फोट करतील,” असे त्यात म्हटले आहे.
पोलिसांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल (BDDS) कर्मचारींसह ईमेलमध्ये नमूद केलेल्या सर्व ठिकाणी तपासणी केली, परंतु या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळली. अजून बरीच शी माहिती त्याने पोलिसानी स्प्ष्ट पणे सांगितलेली नाही.