पेठ नाका M M नाना ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य असं वनश्री केसरी च मैदान पार पडला. काय घडलं या मैदानात हे सविस्तर माहिती तुह्माला या आर्टिकल मधी मी सांगणार आहे. तर या मैदानात एकूण ४०० गाडी मालकांनी स्पर्धेत भाग घेतला होता, त्यातले 7 सेमी फायनल झाल्या तर त्या गाड्या कोणत्या होत्या हे पहिला जाणून घेहून लकी आणि बाजी ,मथूर आणि सुंदर ,बकासुर आणि शंभू ,टाकूर आणि रायफल ,पक्षा आणि सोन्या ,राजा आणि रायफल ८१८१ ,बावर्या आणि हारण्या आणि फायनल साठी ८ गाडी ती म्हणजे राजा आणि माणिक. असं कसं जाला तर एक गाडी डायरेक्ट फायनल ला पळाली तर ती गाडी होती स्वतः M M नाना ची मानाची गाडी सुद्धा या शर्यतीत पळाला तुह्माला काय वाटत हे बरोबर घडलंय का चुकीचं तर सरळ सरळ हे चुकीचं आहे. किती जाला तरी ज्यांनी ७ राऊंड सेमी खेळून आलेले बैल आणि तुह्मी लगेच आपली गाडी पण त्यात फायनल मध्ये टाकतात हे चुकीचं आहे. अशा प्रकारे जर फायनल मध्ये गाड्या जायला लागल्या तर काय फायदा च नाही ना बाकीचा बैल गाड्यांचा आयोजक कोण पण असू तो स्वतःच नियम नाही पाळत तर काय फायदा आहे अशा लोकांचा बैलगाडी क्षेत्रात येव्हडच नाही घडलं तर या शर्यतीत अजून भरपूर काही घडलंय.
दुसरी गोष्ट या मैदानात घडली ती म्हणजे चिठ्या तर स्वतः आयोजक च काडत होते हे चुकीचं आहे. आयोजन अतिशय चुकीचं केला होता याने लहान मुलाच्या हाताने काढल्या पाहिजे म्हणजे कोण नाव नाही ठेवत आणि कोणत्याच गाडा मालकाला काहीच प्रॉब्लेम नसतो. अतिशय लाजिरवाणे गोष्ट या मैदानातील ती म्हणजे पब्लिक गाड्या सुटल्या कि ती फाटे दाबत यायचं पूड त्या मुलं समोरून पळत आलेला बैलाला बिचकायचं आणि तो एक तर फाटा दुसऱ्या साइड ला जायचं नाही तर लोकांच्या अंगावर. नियोजन आयोजनाने आधीच याची काळजी घेतली पाहिजे आणि आधीच फाट्या च्या बाजूला बंदोबस्त करून पब्लिक त्याचा बाहेर उभं केलं पाहिजे त्यामुळं धावणाऱ्या बैलाला कोणताच त्रास नाही जाला पाहिजे.
यात सगळ्याच टिक आहे पण जे महाराष्ट्राचे लाडके बैल फायनल ला पळत होते त्यांचं वर तर लय मोठा अन्याय झालाय, तर तो मथूर आणि सुंदर, बकासुर आणि शंभू , मथूर आणि सुंदर ची गाडी पब्लिक च्या साइड ला लागली होती. त्याला तर मथूर ला तर पब्लिक च्या साइड ला पळता येत नाही पण मथूर नि जे केलं ना ते कोण च नाही विसरू शकत तो असं पळाला त्या साइड ने कि तो सगळ्याचा पूड होता. तरी तो बैल पळत होता पण लोकांनी त्याला नाही साइड नि पळून दिला नाही सरळ जाहून दिला तो खरा होता वनश्री केसरी. तसंच सेम आपला लाडका बकासुर सोबत सुद्धा जाला त्याला तर लोकांनी दगड फेकून मारले असं का केलं लोकांनी हे चुकीचं आहे. पण म्हणतात ना एखाद्याचा चुकी शर्यती मुलं सगळ्यांना ते बोगायला लागत तसंच घडलंय, तर पाहूया कोण बक्षिस पात्र जाला तीन नंबर चा मानकरी पक्षा आणि सोन्या, द्रुतीय नंबर चा मानकरी टाकूर आणि रायफल आणि १ नंबर चा मानकरी लकी आणि बाजी. जरी बक्षीस पात्र दुसरा कोण जाला असलं तर पण पब्लिक ची मन तर याच बैलांनी जिंकली आहे.