ठळक बातम्या
Home » मकर संक्रांत 2024: इतिहास, महत्त्व आणि महाराष्ट्रातील प्रथा | भारतातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सण

मकर संक्रांत 2024: इतिहास, महत्त्व आणि महाराष्ट्रातील प्रथा | भारतातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सण

मकर संक्रांत 2024
मकरसंक्रांत म्हटलं कि सगळ्यांना  तीळ व गुळाचे लाडू आणि आणि ती भोगी घालून केलेली रसाळ अशी मिक्स भाजी आटवती. तर आपल्या देशात सण असला का प्रत्येक सणाशी काही तरी निगडित असतंच ते म्हणजे हा सण कुणी चालू केला आणि कसा, तर चला पाहूया संपूर्ण माहिती.

मकर संक्रांतीची उत्पत्ती

मकर संक्रांतिचा उत्सव हजारो वर्षांपूर्वी भारतात सुरू झाला असून यात काही विशिष्ट व्यक्ति किंवा संस्थापकाचा उल्लेख नाही. हा सण सूर्याच्या चक्रवाढ आणि ऋतुचक्राला जोडलेला आहे, त्यामुळे तो प्राचीन कृषी समाजातून विकसित झाला असल्याची शक्यता आहे. मकर संक्रांति हा दिवस सूर्य उत्तरायणचा शुभारंभ दर्शवतो, जेव्हा सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून दिवस लांब आणि रात्री छोट्या होऊ लागतात, हे वाढत्या उजेडाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच हा सण कृषी कलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण चांगल्या पिका आणि आगामी वर्षातील प्रचुरतेसाठी हा शुभ दिवस मानला जातो.

मकर संक्रांतीचे महत्त्व

भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण- समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या लोम्ब्या, तीळ अशा गोष्टी लहान मडक्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. दसरा सारखच लोक एकमेकांना भेटतात आणि तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणतात.

महाराष्ट्रातील मकर संक्रांतीचे तीन दिवस

महाराष्ट्रात भोगीचा सण

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी महाराष्ट्रात भोगीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सकाळी घर आणि परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढली जाते. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. भोगीच्या दिवशी खाद्यपदार्थांचा विशेष मान केला जातो. या दिवशी मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुंगाची खिचडी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी इत्यादी पदार्थ बनवले जातात. या पदार्थांमध्ये तिळाचा वापर केला जातो. तिळाला शुभ आणि पौष्टिक मानले जाते. भोगीच्या दिवशी घरात जुन्या आणि अनावश्यक वस्तूंची होळी केली जाते. यामुळे नवीन वर्षात नवीन सुरुवात होते असे मानले जाते.

महाराष्ट्रातली संक्रांत सण

मकर संक्रांतीचा १५ जानेवारी हा मुख्य दिवस म्हणजे संक्रांत. हा दिवस सूर्याचा उत्तरायण होण्याचा दिवस असतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचा उत्तरायण होणे हे भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते. या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि “तिळगुळ घ्या आणि गोड बोला” असे म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळ हे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. गुळाची पोळी ही एक गोड आणि चविष्ट पोळी आहे जी गुळ आणि मैदा यापासून बनवली जाते. तिळगुळ हे एक पारंपारिक गोड पदार्थ आहे जे तिळ आणि गूळ यापासून बनवले जाते. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संक्रांतीच्या दिवशी अनेक धार्मिक विधी आणि समारंभ होतात. यामध्ये गंगास्नान, सूर्यनमस्कार, दानधर्म इत्यादींचा समावेश होतो.

महाराष्ट्रातली किंक्रांत सण

मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी किंक्रांत सण साजरा केला जातो. हा दिवस स्नेह आणि मैत्रीचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि एकमेकांच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी शुभेच्छा देतात.

मकर संक्रांतिची विविध राज्य आणि नावे

राज्य मकर संक्रांतीचे नाव
आसाम माघ बिहू
पंजाब माघी
हिमाचल प्रदेश माघी साजी
जम्मू आणि काश्मीर माघी संग्रांद किंवा उत्तरायण
हरियाणा सक्रत
राजस्थान सकरत
मध्य भारत सुकरात
तामिळनाडू उत्तरायण
गुजरात आणि उत्तर प्रदेश घुघुटी
उत्तराखंड घुघुटी
बिहार दही चुरा
ओडिशा मकर संक्रांती
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल संक्रांती
उत्तर प्रदेश खिचडी संक्रांती
उत्तराखंड उत्तरायणी
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संक्रांती
नेपाळ माघे संक्रांती
थायलंड सोंगक्रान
म्यानमार थिंगयान
कंबोडिया मोहन सोंगक्रान
काश्मीर शिशूर सेनक्राथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *