महाराष्ट्रातली घाटातली शर्यत म्हणजे काय हे आज आपन जाणून घेणार आहे. घाटातली शर्यत हि पुणे जिल्यात आणि महाराष्ट्रात खूप फेमस आहे आणि या शर्यतीच्या प्रतेला ४०० वर्षांची परंपरा आहे, घाटातले शर्यतीचं स्वरूप काय असतं. या शर्यतीत बैल ड्राइवर बिना पळतो आणि येवडंच नाही तर या घाटातली शर्यत एकूण ४ बैल आणि १ घोडी सुद्धा पळते, तर गोडी च्या मग पळणाऱ्या बैलांना कांड असं म्हणतात आणि त्या आणि त्याचा माग जी मुख्य बैल पळतात त्यांना जोकडं असं म्हणतात. या बैलगाड्याचं वजन अंदाजे २५ ते ३० किलो च्या दरम्यान असत, बैलगाड्या ला एक ठराविक अंतर पार करायचं असतं ते पण सेकंदावर. सर्वात कमी सेकंदात जो बैल हा अंतर पार करतो त्याला घाटाचा राजा म्हणून घोषीत केलं जात. बैलगाडा पळण्या साठी एक मऊ मातीचा घाट बनवला असतो त्याचा धोनी बाजूला कठडे किंवा भिंत बांधलेली असते आणि तीथच लोक बसून शर्यतीचा आनंद लुटतात. तर आता या शर्यतीत ज्या बैंलनी आपला वर्चस्व आणि नाव कमवलंय त्या बैलांची माहिती पुढील प्रमाणे.
मावळ चा किंग ओम्या
मालक – रामनाथ शेठ वारींगे
ठिकाण – मावळ, पुणे
किताब – महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, भारत केसरी
ओम्या ला ४ वर्षा अधी वारींगे यांनी जालना सभांजीनगर येतुन त्यांनी त्याला बंदी च्या काळात विकत घेतला होता. हा बैलाने अनेक मोट्या – मोट्या शर्यतीत बाजी मारली आहे अनेक जागी घाटाचा राजा आणि पहिला नंबर याने पटकवला आहेत. हा बैल गोठ्यात एकदम शांत आहे आणि जसा बैल घाटात जातो तो गटाचा राजा म्हणून च मिरवतो आणि पळतो असं कि लोक त्याला पाहत च राहतात. या बैलाची शरीर श्रुष्टि अशी दिसायला उंच आणि दंडक शरीर असं आहे, ओम्या बैलाने अनेक बक्षिसे आणि लोकांच्या मनात राज्य केलंय.
भारत केसरी मन्या
मालक – राजुशेठ वसंतराव जवळेकर
ठिकाण – खेड , पुणे
किताब – महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, भारत केसरी , सयाद्री केसरी
मन्या हा महाराष्टतील प्रसिद्ध बैल आहे हा बैल फुलगाव मधून वारींगे याने विकत घेतला होता त्या वेळस त्याला ११ लाख ७५ हजार मधीं विकत घेतला होता. हा बैल पब्लिक चा हिरो आहे, या बैलाने अनेक मोट्या फायनली मारल्यात आणि अनेक जागी त्याच आणि मालकाचं नाव प्रसिद्ध केलंय. मन्या ने दोन वर्षात आता ७५% टक्के फायनल मधीं असतो येवडंच नव्हे तर याने जर घाटाचा राजा नाही जाला तर हा नक्कीच फायनल मारणार. असं हा बैल पळायला लागला तर हा बैल लोक अजून पण भगत बसतात आता पण या बैलाची बारी बगायला लोक गर्दी करतात.
हिरा भारत केसरी
मालक – आनंदराव यशवंतराव वर्पे
ठिकाण – खेड , पुणे
किताब – भारत केसरी
हिरा हा सुद्धा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे हा बैल जाल्ली कट्टू कर्नाटक हितूनं आनंदराव वर्पे यांनी विकत घेतला या बैलाला त्याने १ लाख ४५ हजार ला घेतला. हिरा बैलाने अनेक मोठी काम किर्द्ध केलेली आहे घाटात, हिरा बैल दिसायला मोठा हँडसम च. हिरा बैंलने अनेक घाट गाजवले आहे आणि त्याने चांगली बक्षिसे जिंकली आहे त्यात मोठी बक्षीस म्हणजे थार आणि अनेक गाड्या जिंकल्यात. या बैंलचे मालक अतिशय साधे आणि वारकरी क्षेत्रातील साधा माणूस.
हवेली किंग बंट्या
मालक – आप्पासाहेब साकोरे
ठिकाण – हवेली, पुणे
किताब – हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी
हवेली किंग बंट्या हा बैल १२ महिन्याचा असताना खेड मधून आप्पासाहेब साकोरे यांनी विकत घेतला. हा बैल कांट्यात असताना च जोरात पळत होता म्हणून त्यांना हा बैल विकत घेतला, हा बैल महाराष्ट्रात चांगलाच प्रसिद्ध झाला आहे कि लोकांच्या मनात चांगली जागाच निर्माण केलीय. येवडंच नवे तर हा बैल अतिशय शांत आहे, बंट्या पळायला लागला कि लोकांचं लक्ष त्याचा वरून हालत च नाही या बैलांनी अनेक मोठी शर्यती त्याने मारल्या आहे आणि मालकाचं नाव मोठं केलय.
भारत केसरी मुंगळा
मालक – बाळासाहेब बबन ढोबळे
ठिकाण – नगर, पुणे
किताब – भारत केसरी
मुंगळा या बैलला बाळासाहेब बबन ढोबळे यांनी विडिओ बगुन विकत घेतला होता त्या वेळात १ लाख १५ हजार ला घेतला होता. मुंगळा त्यांनी दीड वर्षा अधी आंध्रप्रदेश मधून विकत घेतला होता हा बैल अतिशय राघीठ आहे हा बैल कधीच ऐकत नाही. मुंगळा नि अनेक मोठ्या घाटातील शर्यतीत नाव पटकावली आहे. बैल महाराष्ट्र्रत प्रसिद्ध आहे मुंगळा बैल दिसायला चित्ता सारखा आणि रंग कला आणि अंगावर पांढरे टिपके.