ठळक बातम्या
Home » चकडी शर्यतीतील महाराष्ट्रत असलेली टॉप ५ बैलं आणि त्यांची संपूर्ण माहिती

चकडी शर्यतीतील महाराष्ट्रत असलेली टॉप ५ बैलं आणि त्यांची संपूर्ण माहिती

बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान

मुळशीचा बकासुर

मालक – मोहील धुमाळ
ठिकाण – मुळशी
किताब – रुस्तम ए हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी

बकासूर हा बैलगाडा शर्यतीतील महाराष्ट्राचा धावणारा एक्सपेस च आहे. जरी त्याच विश्वातला अपरिचित नाव असू शकतो नाही. त्याच्या जिद्दीच्या वेगाने आणि अमोघ धावांनी त्याने महाराष्ट्रभर आपले नाव गाजवले आहे. बकासुर हा गावरान जातीचा हाइट नि जास्त मोटा पण नाही. त्याला पूर्वी सरपंच या नावाने ओळखले जायचे.तो पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मोहिल धुमाळ यांच्या मालकीचा आहे.त्याने जवळजवळ २५ बिनजोड शर्यती जिंकल्या आहेत आणि अनेक ठिकाणी एक नंबरची पारितोषिके मिळवली आहेत. त्याची वेगाची आणि जिद्दीची धावा पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करून येतात.बकासूर हा केवळ एक यशस्वी बैल नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि बैलपोळच्या परंपरेचा एक अभिमानी प्रतिनिधी आहे.

सोनारपाड्या चा सोन्या

मालक – जयेश पाटील
ठिकाण – सोनार पाडा, डोंबिवली
किताब – महाराष्ट्र केसरी चतुर्थ हिंदकेसरी कोकण केसरी

महाराष्ट्रातील अजून एक हिरा म्हणजे सोनारपड्याचा सोन्या बैल या बैलायचं मालक जयेश पाटील. हा सोन्या दिसायला देखणा उंच पांढरा शुभ्र असा दमदार. सध्या जयेश पाटलांकडे सोन्या नावाची ३ बैलं आहे, सोनारपड्याचा मोठा सोन्या ,छोटा सोन्या ,आणि तीन नंबर चा सोन्या यांनी तिघांनी मैदाने गाजवून सोनेरी कामगीरी आपल्या नावावर कोरलेली आहे. जयेश पाटील यांचा ‘सोनारपाडा चा सोन्या’हिंदकेसरी बैल.सोन्या ने बैलाने अनेक मोट्या – मोट्या शर्यती जिंकल्या आहे.हा बैल मुंबईत बिनजोड शर्यत हुकमी एक्का मानला जातो .तसेच तो घाटावरच्या बैलगाड्या मध्ये अव्वल आहे.

राहुल भाई चा मथूर

मालक – राहुल पाटील
ठिकाण – अडिवली, कल्याण
किताब – महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी भारत केसरी

महाराष्ट्रातील मथुर बैल हा बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध बैल आहे. मथुर ला महाराष्ट्राचा पब्लिक किंग या नावाने ओळखले जातो हा बैल पळायला चित्ता सारखा याचा रुबाब च वेगळा. मथुरचे मालक राहुल दादा पाटील हे अडिवली गावातील. या बैलाने आतापर्यंत अनेक बक्षीस जिंकली आहेत यांनी मोठी किताबे सुद्धा आपल्या नावा वर करून घेतलेत, ज्या बैलानं सलग दोन वर्ष धुमाकूळ घातलाय तो म्हणजे मथुर ज्याला बिनजोडीचा बादशाह म्हुणुन ओळखला जातो.कारण जी बैलं ही घाटात आणि घाटाखालच्या शर्यतीत नाव कमवतोच, हा बैलं पुन्हा बिनजोड शर्यत खेळण्यासाठी मुंबई, पनवेल, ठाणे, कर्जत आणि डोंबिवलीला यासारख्या ठिकाणी आणली जातात. तिथं मोठमोठी बैल असतात तरी पण मथुर जिंकल्या शिवाय राहत नाही.

सप्तहिंदकेसरी भारत

मालक – उत्तम गवळी बदलापूर /किरण अप्पा
ठिकाण -बदलापूर/ शाळगाव
किताब – सप्तहिंदकेसरी

उत्तम गवळी बदलापूर /किरण अप्पा शाळगाव यांचा भारत बैल महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. भारत हा बैल त्याचा शरीर घोड्या सारखा दिसायला आणि शरीर श्रुष्टि तर भगत च राहावं या वेगवान पाळणाऱ्या बैलाचा चाहतावर्ग प्रचंड आहे. हा बैल आता पर्यंत भरपूर फायनल मारल्या आहेत आणि तो आता पण असा पळतो कि लोक त्याला पाहायला येतात. या बैलाने त्याच मालकाचं आयुष्य बद्दलंय आणि त्याच मालका बरोबर वेगळंच नात. भारत हा बैल त्याच मालकाचं जीव आहे आणि त्यांनी ताची अशा वेळेस मदत केलीय कि तो शन तो कधीच विसरू नाही शकत तो म्हणजे त्याचा मुलाच्या जन्माचं हॉस्पिटल चा खर्च.

मोठा लक्ष्या

मालक – किरण शेठ राऊत
ठिकाण – बदलापूर
किताब – सप्तहिंदकेसरी

मोठा लक्ष्या हा महाराष्ट्रतील प्रसिद्ध बैल आहे सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा किंग ऑफ बैलगाडा. ५५० च्या वर बिनजोड शर्यती आणि 7 वेळा हिंदकेसरी कोरेगाव ,पुसेगाव ,पेडगाव,वडकी अशा नामांकित मैदानात ज्याने आपला डंका वाजवला. सध्या मोठ्या लक्ष्या चे वय १८ वर्षे आहे, पण आजही त्याला पाहिले की तो काळ उभा राहतो. लक्ष्या घेतल्या तसा त्याने लगेच त्याला शर्यतीत जुंपला होता त्याने पहिल्याच वेळेस त्याने नंबर मारला होतं.मोठा लक्षा ला ७२ लाखाला मागून सुद्धा त्याला उत्तम शेट ने विकला नाही, कारण कि त्यांना त्या बैलाला आपल्या घरच सदस्य मानला आहे. त्यांचं एक च म्हणं आहे कि याने माजी ओळख पूर्ण महाराष्ट्र्रत करून दिलीय त्याला मी का विकू.

बैलगाडा हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक खेळ आहे आणि लोकप्रिय खेळ आहे, या खेळात महाराष्ट्रातील अनेक उत्तम बैल आहेत. तसंच या लेखात मी कोणत्याच बैलाला नंबर दिलेला नाही कारण कि प्रत्येक बैल हा महाराष्ट्र च नंबर वन बैल आहे कोणत्या हि बैलाला पहिला आणि दुसरा नंबर देणे मला तर पटत नाही प्रत्येक बैल हा बैलगाडा मालकाचा आणि त्याचा चाहत्यांचा नंबर वन बैल राहणार. त्यामुळं असंच प्रेम करत रहा प्रत्येक बैलावर आणि आनंद घेत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *